मणक्‍यातील सरकलेली चकती (स्लिप डिस्क)
डॉ. चारुदत्त आपटे, मेंदू शल्यविशारद, पुणे
Friday, April 02, 2010 AT 12:00 AM (IST)

व्यस्त दिनक्रम आणि नोकरीधंद्यातील दगदगीमुळे व्यायामाला वेळ देता न येणे, कामाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बसणे, ओबडधोबड रस्त्यांवरून दुचाकीचा सतत प्रवास करणे व इतर अनेक कारणे पाठदुखी व मणक्‍यांच्या दुखण्यास कारणीभूत ठरतात.

पाठीचा कणा हा विविध मणक्‍यांनी बनलेला असून, दोन मणक्‍यांमध्ये मांसल कुर्चा असतात. जणू काही एखाद्या मशिनच्या दोन भागांत रबरी बुश असावेत. या चकत्या म्हणजे जोडपेशींचे एक चक्र असून, त्याच्या मध्यभागी चिकट जेलीसारखा पदार्थ असतो. यामुळे आपल्या पाठीचा कणा लवचिक असतो, आणि त्याच वेळी एका संरक्षक ढालीसारखादेखील त्याचा उपयोग होत असतो.

चकतीचे संरक्षक कडे अतिदाबामुळे, वयपरत्वे किंवा धावपळीमुळे फाटण्याची शक्‍यता असते. यामुळे मणक्‍यांच्या मधील ही चकती फुटून आतील चिकट गर बाहेर येऊन आजूबाजूंच्या नसांवर पसरला जाण्याचा संभव असतो. या जेलीसदृश पदार्थाच्या गळतीमुळे मज्जारज्जूवर किंवा एखाद्या मज्जातंतूवर दाब येऊ शकतो, आणि या खराब झालेल्या चकतीभोवती किंवा त्या मज्जातंतूच्या आधिपत्याखालील भागावर वेदना होऊ लागतात. अशा प्रकारच्या परिस्थितीला हर्निएटेड, रप्चर्ड, प्रोलॅप्स्ड किंवा सामान्यतः “स्लिप डिस्क’ असे संबोधले जाते. जर या आजाराकडे दुर्लक्ष केले किंवा वेळीच उपचार घेतले नाहीत तर विकलांगतासुद्धा येऊ शकते.

मणक्‍यातील सरकलेली चकती कशी असू शकते?
मणक्‍यातील सरकलेली चकती (स्लिप डिस्क) जर मानेत किंवा पाठीच्या वरच्या भागात असेल तर मज्जारज्जूवर दाब येऊ शकतो. याचे पर्यावसान साध्या मानदुखीपासून अतिशय त्रासदायक अशा विकलांगतेपर्यंत (पॅरालिसिस) होऊ शकते. मज्जारज्जू सामान्यतः कंबरेच्या पहिल्या मणक्‍याजवळ संपतो. त्याखाली घोड्याच्या शेपटाप्रमाणे बारीक नसांचे जाळे असते. मज्जारज्जूप्रमाणे एकदम पॅरालिसिस होण्याच्या शक्‍यता या भागात कमी असतात. त्यामुळे आजारपणाचे स्वरूप साध्या वेदना किंवा अति तीव्र स्वरूपाच्या वेदना, असे असू शकते. स्लिप डिस्क ही समस्या जर पाठीच्या खालच्या भागात असेल तर कंबरदुखी, मणक्‍याची मर्यादित हालचाल, मणक्‍याची लवचिकता कमी होणे, पाठीत जळजळ होणे, तसेच पायापर्यंत खाली वेदना जाणवणे- ज्याला सामान्यतः सायटिका म्हटले जाते, अशी लक्षणे आढळतात. या आजाराचे स्वरूप साध्या वेदना ते एखाद्या शरीराच्या भागात किंवा संपूर्ण पायात खालपर्यंत अशक्‍तता जाणवणे, असे असू शकते.

स्लिप डिस्कवर उपचार कसे करावेत?
जेव्हा वेदना हेच एकमेव लक्षण असेल तर स्लिप डिस्कचा त्रास असणाऱ्या 70 ते 75 चक्के रुग्णांना कोणत्याही उपचाराविना बरे होण्याची उत्तम संधी असते. आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे “14 दिवसांची संपूर्ण विश्रांती (बेडरेस्ट)’ हे रुग्ण घेऊ शकतात. या प्रकारच्या रुग्णांना “प्राथमिक स्वरूपाचा उपचार’ म्हणून शस्त्रक्रियेची गरज नसते. (दुर्दैवाने कधी कधी शस्त्रक्रिया हाच उपचार असल्याचे रुग्णाला ठासून सांगितले जाते.) वेदनेची तीव्रता कमी झाल्यावर हळूहळू हालचाल सुरू करता येते. याचबरोबर पाठीच्या कण्याचे आणि स्नायूंचे व्यायामाच्या माध्यमातून बळकटीकरण करता येते.
 
वेदना सहनशीलतेच्या पलीकडे असतील तर ओझोन न्यूक्‍लिओलिसिस सारखी सुरक्षित, परिणामकारक आणि शस्त्रक्रियेसारख्या खर्चिक उपचारास पर्याय ठरू शकणारी उपचार पद्धती वापरली जाते. यामध्ये चकतीचे आकारमान कमी करण्यासाठी चकतीमध्येच ओझोन वायूचे इंजेक्‍शन देण्यात येते. हा उपचार ओपीडी तत्त्वावर बाधित भागाला भूल देऊन करता येतो. या उपचारानंतर रुग्णाला बिछान्याला खिळून राहण्याची गरज नसते. आता आपण “ओझोन’ नक्की कसा काम करतो, याचा थोडक्‍यात आढावा घेऊ या. ओझोन हा अतिशय तीव्र आणि क्रियाशील वायू आहे. ऑक्‍सिजनच्या तीन अणूंचा संगम होऊन “ओझोन’चा एक रेणू तयार होतो. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा वापरली जाते. (3ज2+68400 लरश्र = 2ज33) ज्या वेळेला ओझोनचा रेणू पाण्यात विरघळतो त्या वेळी ही प्रचंड ऊर्जा विस्थापित केली जाते. ओझोन वायूचे गुणधर्म आणि या ऊर्जेचा एकत्रित वापर होऊन चकतीतील पेशींची त्रिमितीय रचना ही द्विमितीय रचनेमध्ये रूपांतरित होते. याचा परिणाम म्हणजे चकतीचा आक्रसून आकार कमी होणे व परिणामतः नसेवरचा दाब कमी होऊन रुग्णास असलेला नसेचा त्रास कमी होणे.

सरासरी 85 ते 95 टक्के रुग्ण- ज्यांचा हा त्रास दोन महिने किंवा कमी दिवसांपासून सुरू आहे ते या उपचाराने कायमस्वरूपी बरे होऊ शकतात. बऱ्याच वेळा एका इंजेक्‍शननंतर रुग्ण त्याच्या प्राथमिक गरजा भागतील अशी कामे करू शकतात.

2-3 महिन्यांपेक्षा जुना त्रास असणाऱ्या रुग्णांना मात्र दोनपेक्षा जास्त इंजेक्‍शनची गरज पडू शकते.

ओझोन न्यूक्‍लिओलिसिसचे फायदे
1) ऑपरेशनसंबंधित धोके टळणे
2) रुग्णालयात दाखल होण्याची गरज नसणे
3) शस्त्रक्रियेपेक्षा अतिशय कमी खर्चात उपचार
4) या उपचार पद्धतीत कोणत्याही प्रकारचा जीवघेणा धोका नाही
5) जवळपास 90 टक्के रुग्णांचा त्रास कमी होण्याची खात्री

या उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या आणि ज्या रुग्णांमध्ये मज्जातंतूशी निगडित हानी झाली असेल- जसे कमालीचा थकवा, वाढत जाणारा संवेदना ऱ्हास, मलमूत्र विसर्जनात समस्या उद्‌भवणे, असे असेल तर अशाच रुग्णास मज्जातंतूंशी संबंधित शस्त्रक्रियेची गरज असते.

हे कसे टाळाल?
स्लिप डिस्कच्या समस्येतून रुग्ण बरा झाल्यानंतर रुग्णाने व्यायाम आणि त्याच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल न केल्यास ही समस्या पाठीच्या कण्यात दुसरीकडे कोठेतरी उद्‌भवू शकते. शरीराचे वजन कमी करणे, स्नायूंच्या बळकटीकरणासाठी व्यायाम करणे, योग्य रीतीने बसणे आणि वजन उचलणे टाळणे, इत्यादीसारख्या उपायांनी आपण स्लिप डिस्क टाळू शकतो.

Posted by: pandhri | डिसेंबर 9, 2009

‘ने मजसी ने’ – एक भावदर्शन

ने मजसी ने’ या सुप्रसिद्ध कवितेचे येथे दिलेले विवरण पुण्याचे स्वामी माधवानंद यांनी केले आहे :

“मोठया गौरवाने गावं असं हे गीत आपण अनेकदा ऐकलं आहे. त्याच्या शब्दांतून जी वेदना प्रगट होते ती जाणून घेऊन ते शब्द ऐकले पाहिजेत. असं झालेलं नाही, की सावरकर सहज साईट सिइंगला ब्रायटनच्या समुद्रतीरी गेले आणि एकदम त्यानां गीत स्फुरलं वेदनदेखील कशामुळे होती ती परिस्थिती कळली पाहिजे की काय घडत आलं होतं आणि काय मोडत होतं !

काय घडत होतं ?

हे सर्व ऐन तारूण्यातले मोठे उत्साही आणि बुध्दिमान देशभक्त होते. एकदा सावरकरांना लंडनमधील प्रसिध्द वृत्तपत्राच्या प्रतिनिधिने विचारलं होतं, की तुमच्यावर सतत लक्ष ठेवलं जातं, तुमच्या मागे सतत पोलिसांची नजर असते ते तुम्हाला कसं वाटतं ? त्यावर सावरकर म्हणाले, “We don’t mind. They may follow us if the atmosphere suits them !” टिपिकल ब्रिटिश विनोद म्हणून त्यांच्या या उदगाराचं कौतुक झालं होतं. India House हे कार्याचे केंद्र. तिथलं वातावरण तर अत्यंत भारलेलं होतं. हा मदनलाल धिंग्रा, सावरकर स्वतः सेनापती बापट हे सगळे त्यावेळेला रसरसते तारूण्य आणि देशप्रमाचं वारं डोक्यात घेऊन वावरणारे स्फूर्तिशील युवक होते. सेनापती बापट यांचा घातलेला वृध्दपणीचा फोटोच आम्ही नेहमी पाहत आलो आहोत. लहानपणापासून ते तसे दिसत नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप एवढी पडत असे, की त्यांची एक फ्रेंच मैत्रीण जिला त्यांनी फ्रेंच भाषेतलं बॉम्बस्फोटाचं लिटरेचर ट्रान्सलेट करून द्यायची रिक्वेस्ट केली होती. तिने आपली परीक्षा बाजूला ठेवून – ड्रॉप घेऊन प्रथम ते इंग्लिशमध्ये भाषांतरित करून दिलं. त्याच्या प्रती काढून सावरकरांनी भारतातल्या क्रांतीकारकांना पाठवल्या. त्याचाच उपयोग पुढचे बॉम्बस्फोट केले गेले. लंडनमध्ये देखील ‘पारतंत्र्यात राहणं मान्य नसणं हा गुन्हा नसून गौरवाची गोष्ट आहे’ असा मतप्रवाह होता. अनेक क्रातिकारकांचं ते कार्यस्थळ होतं. रशियन क्रांतीची सूत्रे देखील तेथूनच हलत होती. हिंदुस्थानातल्या तरूणांच्या कार्याचा प्रभाव वाढत होता.

काय मोडणार होतं ?

हे सर्व क्रांतिकार्य देशाबाहेरून चाललं होतं. इटलीला स्वातंत्र्य मिळवून देणा-यांत सिंहाचा वाटा असलेल्या मॅझेनीचं आत्मचरित्र सावरकरांनी भाषांतरित करून भारतात पाठवलं होतं. त्याची सावरकरांच्या भाषेतली प्रस्तावना एवढी तेजस्वी आणि प्रेरणादायी होती, की ब्रिटिश सरकारला भीती वाटली आणि तिच्यावर बंदी आणली. अर्थातच ती जास्त प्रसिध्द झाली. सावरकरांना लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत करून लंडनला पाठवल होतं. टिळक आणि सावरकर दोघांच्या बुध्दिमत्तेबद्दल तिथे आदर होता. बॅरिस्टरची परीक्षा पास होऊन पदवी दिली न गेलेला तरूण म्हणून सावरकरांबद्दल सहानुभूती होती. याचवेळी मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला गोळ्या घालून मारल्यामुळे सर्व लोकमत सावरकर आणि सहकारी यांच्या विरूध्द गेलं. बाबाराव सावरकरांकडे बॉम्बस्फोटाच्या साहित्याची भाषांतरित प्रत सापडली होती. इतर आरोपांसह त्यांना जन्मठेपेची सजा दिली गेली. मदनलालच्या निषेधाला सावरकरांनी विरोध केल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्यावर केंद्रित झाल्या. भारतातल्या क्रांतिकार्यात सुसूत्रता आणून त्याची सूत्रे लंडनमधून हलविण्याची शक्यता मोडून पडली. लंडनमधील कार्य उदध्वस्त होण्याची वेळ आली.

घर मोडकळीला आल्याचा – दोघं भाऊ पकडले गेल्याचा – धक्का होताच. माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही तो क्रांतीकारी बनतो. घरावर राष्ट्राच्या नावाने बेल तुळस वाहून हे लोक बाहेर पडले तरी प्रेम जिवंतच असतं ही माणसं सामान्य नव्हती. एवढया मोठया सत्तेशी ते थोडेच लोक झुंज घेत होते. अख्खा समाज तुमच्या बाजूने असला तरी तो तुमच्या बाजूने उभा राहत नाही. त्याला उभं करायचं आणि त्याचवेळेला एकाकी झुंजायचं असं अवघड काम ते करीत होते. कुटुंबाची वाताहत, कार्य उदध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपणं आणि स्वतः शंभर टक्के पकडले जाणार आहोत हे कळणं यातून अक्षरशः पळून जाऊन ते त्या ब्रायटनच्या किना-यावर बसले होते. पकडलो गेलो तर परत भारतात पाठवतीलच असं सांगता येत नाही हा अत्यंत अस्वस्थ करणारा विचार आणि समोर सागर. तो मध्ये आहे म्हणून जाऊ शकत नाही. या भावनेतून ते शब्द आले – ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ जणू काही ते त्यांचा सगळा भावनिक आघात सागरावर करीत आहेत – त्या सागरावर रागावलेला – रूसलेला हा मातृभूमीचा प्रियपुत्र म्हणतो – ‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस.

भूमातेच्या चरणतला तुज धूता ।
मी नित्य पाहिला होता

त्यावेळेला मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास – मित्र मित्राला म्हणतो तसा – की चल जरा फिरायला जाऊ
दुस-या देशात-

मज वदलासी अन्य देशी चल जाऊ ।
सृष्टीची विविधता पाहू

त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली.

तअ जननी-ह्रद विरहशंकितहि झाले ।
परि तुवां वचन तिज दिधले

पण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन – जहाज सागराच्या पृष्ठावरून म्हणजे पाठीवरूनच नेलं जातं. त्यानुसार

मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन।
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी

तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. तू जगभर सगळीकडे आहेस त्यामुळे जगाचा तुला अनुभव असाणार हा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव यावा ही इच्छा या दोन्हीच्या योगे मी ‘बनलो’ तयार झालो आणि ‘बनलो’ म्हणजे फसलो.

तव अधिक शक्त उदधरणी । मी

पाणी कोणत्याही वस्तुला उत् म्हणजे वर धारण करतं वर ढकलंत त्याला उदधरण (buoyancy) म्हणतात. त्यामुळे वस्तूचं वजन पाण्यात कमी वाटतं. हा उदधरण. शक्तिचा शास्त्रीय अर्थ आणि ‘उद् धार करणे’ याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी – तुझ्या उद् धरण शक्तीवर जास्त विश्वासलो. इथं अडकवून चांगला उद् धार केलास बरं !

‘येईन त्वरे’ कथुन सोडिले तिजला ।
सागरा प्राण तळमळला ।।१।।

लवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ।
ही फसगत झाली तैशी

पोपट पिंज-यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तसा फसलो.

भू विरह कसा सतत साहू या पुढती ।
दशदिशा तमोमय होती

तमोमय म्हणजे अंधःकारमय – मार्ग दिसत नाही असं झालंय.

गुणसुमने मी वेचियली या भावे ।
की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद् धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा

मला काय आठवतं ? तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही आणि इकडच्या माणसांना आमच्या कुटुंबातल्या माणसांप्रमाणे घरात ती आम्रवृक्षासारखी वत्सलता ही नाही. त्यांच्यावर पुढची पिढी नवलतांसारखी वाढते आणि तिच्या पुढच्या पिढीची फुलंही त्या वृक्षवेलींवर नांदतात. ही सुंदर कुटुंब वत्सलता – प्रेम इथे नाही.

ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला ।
सागरा प्राण तळमळला ।। २ ।।
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी ।
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।
वनवास तिच्या जरि वनिंचा

राज्य तर नकोच आहे पण वनवास सुध्दा तिच्याच वनातला हवा आहे. तुरूंगात घातलं तरी भारतातल्या तुरूंगात यांनी घालावं पण एखादे वेळेस हे इथेच कुठेतरी डांबून ठेवतील, ते नको आहे.

भुलविणे व्यर्थ हे आता । रे
बहु जिवलग गमते चित्ता । रे
तुज सरित्पते, जी सरिता । रे

हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती – इथलं काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. सागराला म्हणत आहेत –माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतामातेचा मला विरह घडवशील तर हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत तर – मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.

तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला ।। ३ ।।

यानंतर आता शेवटचं कडवं आहे त्यात सावरकरांची आर्त आहे ; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे. सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत तर त्याच्या लाटा तशाच उसळून फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्या प्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरूषाने आव्हान दिल्यावर खलपुरूष असेच हसतात. असं वाटून ते म्हणतात-

या फेन-मिषे हससि निर्दया कैसा ।
का वचन भंगिसी ऐसा ?

माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस, की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा ? हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणा-या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणा-या सागरा,

त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।
भिउनि का आंग्लभूमी ते ?
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी ।
मज विवासना ते देशी

विजनवास विदेशवास किंवा विवास – तू मला देतो आहेस पण अरे, आंग्लभूमीला भिणा-या भित्र्या खलपुरूषा, ऐक –

तरि आंम्लभूमी भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे

माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल. पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस.

कथिल हे अगस्तिस आता । रे

आमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू.

मातृभूमीला दुरावलेला आणि कायमचा दुरावला जाईल अशी शक्यता असलेला एक वीर पुरूष सागरावर रूसलेला आहे. वेदनेतून निर्माण झालेल्या ह्या अप्रतिम काव्यातून महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट झालाय. युवा केंद्राचं आगळेपण हे आहे की सागरावरचं हे तुफानी काव्य गात आहे सागरच !

साभार – स्वरूपयोग

Posted by: pandhri | डिसेंबर 7, 2009

इतिहास म्हणजे काय?

Posted by: pandhri | डिसेंबर 1, 2009

शेर शिवराज है … !

इंद्र जिमि जृंभपर ! बाडव सुअंभपर ! रावण सदंभपर ! रघुकुल राज है … !
पौन वारिवाह पर ! संभु रतिनाह पर ! ज्यो सहसवाह पर !राम द्विज राज है … !
दावा दृमदंड पर ! चिता मृगझुंड पर ! भूषण वितुंड पर ! जैसे मृगराज है … !
तेज तमंअंस पर ! कन्न्ह जिमि कंस पर ! त्यों म्लेंच्छ बंस पर ! शेर शिवराज है … !

शेर शिवराज है … शेर शिवराज है … शेर शिवराज है … शेर शिवराज है … !

… कवीराज भूषण.

भाषांतर :

जृंभासुरास जसा इंद्र, समुद्रास वडवानल, (१) गर्विष्ठ रावणास रामचंद्र, (२) मेघास वायु, मदनास शिव, (३) सहस्त्रार्जुनास परशूराम, (४) वृक्षास दावाग्नी, हरिण कळपावर चित्ता , (५) हत्तिस सिंह , (६), अंध:कारास प्रकाष, कंसास श्रीकृष्ण ,(७) त्याप्रमाणे म्लेंच्छकुळावर सिंहासमान शूर शिवराज होय.

Posted by: pandhri | डिसेंबर 1, 2009

सिवराज देखीये … !

सक्र जिमि सैल पर । अर्क तम-फैल पर । बिघन की रैल पर । लंबोदर देखीये … !

राम दसकंध पर । भीम जरासंध पर । भूषण ज्यो सिंधु पर । कुंभज विसेखिये … !

हर ज्यो अनंग पर । गरुड ज्यो भूज़ंग पर । कौरवके अंग पर । पारथ ज्यो पेखिये … !

बाज ज्यो विहंग पर । सिंह ज्यो मतंग पर । म्लेंच्छ चतुरंग पर । सिवराज देखीये … !

सिवराज देखीये … सिवराज देखीये … सिवराज देखीये … सिवराज देखीये … !

… कवीराज भूषण.

भाषांतर :

ज्या प्रमाणे ईंद्र पर्वताचा, सुर्य अंध:काराचा व विग्नहर्ता गणराज विघ्नसमुदायाचा नाश करतो, (१)किंवा ज्या प्रमाणे रामाने रावणाचा व भीमाने जरासंधाचा नाश केला, अगस्त्ति ऋषींनी समुद्राचा घोट घेतला, (२)महादेवाने मदनास जाळून भस्म केले, अर्जुनाने कौरवांचा नि:पात केला, (३)किंवा सर्प गरुडास, पक्षी बहिरी ससाण्यास व हत्ती सिंहास बघुन भयभीत होतात, तद्वत इस्लामी चतुरंग सैन्य शिवरायांच्या पराक्रमासमोर भयभीत होते.

Posted by: pandhri | डिसेंबर 1, 2009

कुंद कहा, पयवृंद कहा … !

कुंद कहा, पयवृंद कहा, अरूचंद कहा सरजा जस आगे ?
भूषण भानु कृसानु कहाब खुमन प्रताप महीतल पागे ?
राम कहा, द्विजराम कहा, बलराम कहा रन मै अनुरागे ?
बाज कहा मृगराज कहा अतिसाहस मे सिवराजके आगे ?

… कवीराज भूषण.

भाषांतर :

कुंद, दुध व चंद्र यांची शुभ्रता शिवरायांच्या यशासमोर काय आहे ? (१), पृथ्वीवर पसरलेल्या शिवरायांच्या प्रखर प्रतापापुढे सुर्य व अग्नी यांच्या तेजाचा काय पाड ? (२), समरप्रियतेमध्ये दाशरथी राम, परशूराम व बलराम हे देखिल शिवरायांच्या मागेच होत.(३) आणि धाडस पाहिले असता बाज (बहिरी ससाणा – पक्ष्यांवर झेप घेणारा) व सिंह हे शिवरायांच्यापुढे तुच्छ होत.

पैज प्रतिपाल भर भुमीको हमाल,चहु चक्कको अमाल भयो दंडक जहानको … !
साहीन की साल भयो, ज्वार को जवाल भयो,हर को कृपाल भयो, हर के विधानको … !
वीर रस ख्याल सिवराज भू-अपाल तेरो,हाथके बिसाल भयो भूषण बखानको … !
तेज तरवार भयो, दख्खनकी ढाल भयो,हिंदुकी दिवार भयो, काल तुरकानको … !

काल तुरकानको … काल तुरकानको … काल तुरकानको … काल तुरकानको … !

… कवीराज भूषण.

भाषांतर :

शिवराज भूपाल – प्रतिज्ञा पूर्णत्वास पोचवणारा, भूमीभार शिरावर घेणारा, चहूं दिशांच्या राज्यांवर अम्मल गाजवणारा, जगतास शासन करणारा, तसेच बादशहास शल्ल्याप्रमाणे जाचणारा, (प्रजेची) पीडा हरण करणारा आणि नरमुण्डमाला अर्पण करण्याच्या विधीने महादेवावरही कृपा करणारा असा झाला. भूषण म्हणतो तूझी तरवार दख्खनला ढालीप्रमाणे व हिंदूंना भिंतीप्रमाणे रक्षण करणारी झाली असून तुर्कांन्ना (ईस्लामला) मात्र प्रत्यक्ष काळ झाली आहे. वीररस प्रिय अशा शिवरायाच्या विशाल भुजांचे (ज्या स्वत: शक्ती संपन्न असून इतरांनाही शक्ती देणार्‍या आहेत) कोण वर्णन करू शकेल ?

Posted by: pandhri | डिसेंबर 1, 2009

जै जयंति … !

जै जयंति जै आदि सकति जै कालि कपर्दिनी … ।
जै मधुकैटभ – छलनि देवि जै महिषविमर्दिनि … ।
जै चमुंड जै चंड मुंड भंडासूर खंडिनि … ।
जै सुरक्त जै रक्तबीज बिड्डाल – विहंडिनि … ।
जै जै निसुंभ सुंभद्दलनि भनि भूषन जै जै भननि … ।
सरजा समत्थ सिवराज कहॅं देहि बिजय जै जग-जननि … ।

… कवीराज भूषण.

भाषांतर :

हे आदिशक्ति ! हे कालिके ! हे कपर्दिनि (गौरी) ! हे मधुकैटभ महिषासूरमर्दिनि देवी ! हे चामुंड देवी ! हे भंडासूर्खंडिनी ! हे बिडाल विध्वंसिनी ! हे शुंभ-निशुंभ – निर्दालिनी देवी ! तुझा जयजयकार असो ! भूषण म्हणतो हे जगज्जननी ! सिंहासमान शूर अशा शिवरायास विजय देत जा.

Posted by: pandhri | डिसेंबर 1, 2009

शाइस्तेखान… !

दच्छिन को दाबि करि बैठो है । सईस्तखान पूना मॉंहि दूना करि जोर करवार को ॥
हिन्दुवान खम्भ गढपति दलथम्भ । भनि भूषन भरैया कियो सुजस अपार को ॥
मनसबदार चौकीदारन गंजाय महलनमें ।मचाय महाभारत के भार को ॥
तो सो को सिवाजी जे हि दो सौ आदमी सों ।जीत्यो जंग सरदार सौ हजार असवार को ॥

… कवीराज भूषण.

भाषांतर :

शाइस्तेखान दक्षिण हस्तगत करून पुण्यात ठाणे देऊन बसला. या वेळी हिंदूंचा आधारस्तंभ व किल्लेदारांच्या एका सेनानायकाच्या तरवारीस जोर चढला अन् त्याने अपार सुकिर्ती मिळवली. (ती अशी मिळवली की)मोठमोठ्या मनसबदारास व चौकिदारास जखमी करून त्याने महालांत शिरून महाभारत माजवण्यास (युद्ध करण्यास) सुरुवात केली !भूषण म्हणतो, कि हे शिवराया, तुझ्या शिवाय दुसरा पराक्रमी कोण आहे ? ज्याने फक्त दोनशे माणसांनिशी लाख स्वार असणार्‍या सरदाराबरोबरचे युद्ध जिंकले.

Posted by: pandhri | डिसेंबर 1, 2009

सिवा नरेस भ्रकुटी चढाई है … !

प्रेतिनी पिसाच रु निसाचर निसाचरि हू, मिलि मिलि आपुसमे गावत बधाई है ।
भैरों भूत प्रेत भूरी भूधर भयंकर से, जुत्थ जुत्थ जोगिनी जमाती जुरि आई है ।
किलकि किलकि कै कुतूहल करति काली, डिमडिम डमरू दिगंबर बजाई हैं ।
सिवा पूंछै सिव सों “समाजु आजु कहॉ चली”, काहू पै सिवा नरेस भ्रकुटी चढाई है ॥

… कवीराज भूषण.

भाषांतर :

(या छंदात भूषण कवीने काल्पनिक शिव – पार्वती संवाद वर्णिलेला आहे)प्रेते, पिशाच्चे, राक्षस, राक्षसी जमून आपापसात आनंदाने गात आहेत. पर्वताप्रमाणे धिप्पाड शरीरे धारण करणारे भैरव, तसेच भूते, प्रेते यांच्या झुंडीच्या झुंडी जमू लागलेल्या आहेत, कालीदेवता किल किल शब्द करून जमलेल्या समाजाचे कौतुक करीत आहे, आणि महादेव आनंदाने डमरू वाजवत आहे. हा शिवगणाचा आनंद पाहून पार्वतीने महादेवास विचारले,“महाराजा, आज आपली मंडळी कुठे निघाली आहेत? “महादेव म्हणाले,“आज, शिवराज कोणा शत्रुवर कृद्ध झालेले आहेत.”

Older Posts »

प्रवर्ग